ते म्हणतात...


प्रत्येक
व्यक्तीमध्ये ईश्‍वर असतो, हे लक्षात आले, तेव्हा प्रत्येक व्यक्तीकडे
आदराने, पूज्य भावनेने बघू लागलो. त्यांच्यांत ईश्‍वराचे रूप न्याहाळू
लागलो; तत्क्षणी भोवतीचे सगळे बंध तुटले, मुक्त झाल्यासारखे वाटले. -
स्वामी विवेकानंद

सल्ले अनेकजण ऐकतात; पण ऐकलेल्या सल्ल्याचा उपयोग करून यश मिळविण्याचा मार्ग फार थोडे स्वीकारतात.
- सायरस (लॅटिन लेखक)

नकारात्मक विचारांच्या त्यागामुळे आणि ध्येयाच्या सतत पाठपुराव्यामुळे यश व पुरस्कार मिळतो.
- नेपोलियन हिल

कुठल्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल, तर प्रेरणेची गरज केवळ एक टक्का असते, उरलेले 99 टक्के हे परिश्रमच असतात.
- थॉमस एडिसन

प्रतिकूल परिस्थिती आपल्या मनाला लढायला शिकविते आणि परिपक्वही बनविते.- हॅजलिट
(इंग्रजी लेखक)

प्रतिकूल परिस्थितीमध्येच आपल्याला स्वतःची ओळख होते.
- अज्ञात

वयानुसार त्वचेला सुरकुत्या पडतात; पण मनाला त्या पडू देऊ नका. दुर्दम्य उत्साह कधीही मावळता कामा नये.
- जेम्स गार्फिल्ड

कुठल्याही पत्राला रागामध्ये उत्तर देऊ नका.
- चिनी म्हण

स्वातंत्र्यरूपी सोन्याचा दरवाजा उघडण्यासाठी शिक्षणरूपी किल्ली उपयोगी ठरते.
- जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

क्षमा करा......"राजे".........आम्हाला क्षमा करा.


क्षमा करा......"राजे".........आम्हाला क्षमा करा.
गुढीपाडवा
म्हणजेच छत्रपति
संभाजी महाराज
पुण्यतिथी.

पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु
घरोघरी गुढ्या उभारतात.
त्याची 'याद' मनात
ठेऊन औरंगजेबाने आजची
संध्याकाळ निवडली होती.
की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना
त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या
राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर
टांगवून मिरवून दाखवू.
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे
उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

एक छोटीसी प्रेमकहाणी

एक छोटीसी प्रेमकहाणी

एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?

देव म्हणाला
...
बागेतून एक फुल घेवून ये.

ती मुलगी फूल आणायला गेली ,

तिला एक फूल आवडल ,

पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,

ती पुढे चालली गेली ,

पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,

जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,

तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,

तिला खूप पश्चाताप झाला ,

तिने देवाला येऊन सांगितलं ,

तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "

जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .

तेव्हा त्याची कदर नाही करत

पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत ..!
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

तु मला आवडतेस

तु मला आवडतेस

नाही !

मी प्रेम करत नाही तुझ्यावर !

पण होय तु मला आवडतेस.

याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो.

मला कोणाचं बोलणं आवडतं, कोणाचं चालणं.

कोणाचे डोळे आवडतात, तर कोणाचं हसणं.

याचा अर्थ असा नाही कि मी त्या सा-यांवर प्रेम करतो.

कारण, आवड नी प्रेम यात फरक आहे.

आवड मर्यादीत.

म्हणुनच त्याला विशेषणांची गरज आहे.

उगाच का म्हणतो आपण,

थोडं आवडतं जास्त आवडतं.

कधी म्हणताना ऎकलंय ?

माझं थोडंसच प्रेम होतं !

पण प्रेम ? प्रेम म्हणजे?

आयुष्यभर एखाद्याची सोबत करावीशी वाटणं,

आयुष्याच्या टोकापर्यंत त्याच्या सोबत चालणं !

मग वाट कशीही असो,

काट्याकुट्यांची वा मखमलीची, त्यात अंतर नाही.

आणी तुझ्या सोबत आयुष्य वाटुन घ्यावं

असंतर मला कधीच वाटलं नाही.

म्हणुनच म्हणलोना, मी तुझ्यावर प्रेम करत नही.

पण, तु मला आवडतेस.

तु मला आवडतेस, तुझ्या दिसण्यामुळं !

नव्हे.. तर तुझ्या असण्यामुळं.

होय, तुझ्या असण्यामुळं.

नुसतं असण्यामुळं म्हणण्यापेक्षा.

सोबत असण्यामुळं.

हे जास्त बरोबर आहे.

बस्स ! अशीच सोबत रहा.

कारण

तु मला आवडतेस :)
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मी हसत असतो याचा अर्थ असा नाही...........

मी हसत असतो

याचा अर्थ असा नाही,

माझं डोकं जाग्यावर नाही;

दु:खाचे प्रदर्शन करुन,

सांत्वनाचे शब्द मिळवण्यापेक्षा,

हसत राहणे वाईट नाही

मी सुखात असत

याचा अर्थ असा नाही,

दु:खात मी होरपळलो नाही;

दुसऱ्याला दु : खात खेचण्यापेक्षा,

एकट्याने होरपळणे चुकीचे नाही

सर्वांची खिल्ली उडवतो,

याचा अर्थ असा नाही,

मला त्यांच्या भावनांची कदर नहीं;

खोटी समजूत घालून,

मर्जीत राहण्यापेक्षा,

खिल्ली उडवणे वाईट नाही

कट्ट्यावर टपोरिगिरी करतो,

याचा अर्थ असा नाही,

की प्रेम मला समजत नाही;

प्रेम करुन कुणाला फसवण्यापेक्षा,

कट्ट्यावर शिट्ट्या मारणं,

टपोरिगिरीचे लक्षण नाही

पीजे मारून हसवतो,

याचा अर्थ असा नाही,

की मला परिस्थितीचे गांभीर्य नाही;

तणाव निर्माण करण्यापेक्षा,

पीजे मारून हसवण्यात

काही गैर नाही

याचा अर्थ असा नाही

की मला काही काम नाही
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

.................जीवन कविता,,,,,,,,,,,,,,,,,

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माशाची भागत नाही तहान
स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप
वाटी वाटीने ओतले तरी कमीच पडतं तूप
बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो पण मागू नको वेळ
करियर होतं जीवन मात्र, जगायचं जमेना तंत्र
बापची ओळख मुलं सांगती पैसा छापायचे यंत्र
चुकुन सुट्टी घेतलीच तरी स्वत: पाहुणा स्वत:च्याच दारी
दोन दिवस कौतुक होतं नंतर डोकेदुखी सारी
मुलच मग विचारू लागतात अजुन का हो घरी ??
त्यांचाही दोष नसतो , त्यांना सवयच नसते मुळी.
क्षणिक औदसिन्य येतं , मात्र पुन्हा सुरू होतं चक्र
करियर करियर दळण दळता दळता, स्वास्थ्य होतं वक्र
सोनेरी वेळी वाढत जातात घराभोवती चढलेल्या
आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सावरलेल्या
आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागते काही
धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही
सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं.
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Engineering मध्ये काय असतं...........?????

Engineering मध्ये काय असतं



Assignment, Drawing sheet, Exam आणि Result शिवाय काही नसतं



Assignment म्हणजे काय असतं



शुद्धलेखानाच काम असतं



Drawing sheet म्हणजे काय असतं



काचेवरच कोरिव काम असतं



Exam म्हणजे काय असतं



एकमेकांना मदत करण्याच काम असतं



Result म्हणजे काय असतं



पार्टीला जाण्याचा कारण असतं





Electrical मध्ये काय असतं



Transformer शिवाय काय नसतं



Mechanical मध्ये काय असतं



Rankine cycle शिवाय काय नसतं



Civil मध्ये काय असतं



कराचीच्या mean sea level शिवाय काय नसतं



Production मध्ये काय असतं



Male female शिवाय काय असतं



IT मध्ये काय असतं



Copy Paste शिवाय काय नसतं



Electronics मध्ये काय असतं



पोरींशिवाय काही नसतं





First Year मध्ये काय असतं



नविन मित्र भेट्न्याचा निमित्त असतं



Second year मध्ये काय असतं



Diploma चे मित्र येण्याचा कारण असतं



Third year मध्ये काय असतं



Drop मधील मित्र येणे असतं



Last year मध्ये काय असतं



मित्रांशिवाय काही नसतं





Thats why engineering म्हणजे काय असतं



मित्र बनवन्याच काम असतं
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

...................भेट...................

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार
मी तुला
असशील तिथे सुखी राहा, ह्याच
माझ्या शुभेच्छा तुला
निरोप तुला देतांना अश्रू माझे
वाहतील
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून
नेतील
त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब
तुझेच असेल
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात
माझा दिसेल
वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे
नाही
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे
नाही
आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार
नाही
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे
सोडणार नाही
जातेस पण जातांना एवढे सांगून
जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील
का?
जाता जाता थोडे तरी मागे वळून
पाहशील का?
प्रत्येक्षात
नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?
बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल
गोंधळaलेल्या अंत:कर्णाची खबर
मला सांगेल
कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्या पुरता तरी , तू नक्कीच
माझी राहशील!
नजरेने जरी ओळखलेस तू,
शब्दांनी मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ
आणणार नाही
नेहमीच पराभव झाला तरी , हक्क
तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शप्पत
सांगतो.... पुन्हा प्रेम करणार
नाही......
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

प्रेम हे असेच असते

असं फक्त प्रेम असंत त्याला हृदयातचं जपायचं असतं
आभाळाइतकं विशाल, अणूरेणूइतकं सूक्ष्म स्वैर विहार करणारं, बन्दिवान करणारं
सुखाचा महासागर, दुःखाचा डोंगर हास्याचा फुलोरा, कोसळणारा अश्रुंचा मनोरा
फुलपाखरासारखं चंचल, दगडासारखं अचल कधी शहाणपणाचं, कधी मुर्खपणाचं
वाट बघायला लावणारं, कधी मुर्खपणाचं निःस्वर्थी त्यागी, नाहीतर स्वार्थी भोगी
प्रेमात अधिकार असतो पण गाजवायचा नसतो प्रेमात गुलाम असतो
पण राबवायचा नसतो प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं असतं पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं कळत नकळत कसं होतं
ते मात्र कधीच कळत नसतं ... असं फक्त प्रेमच असतं
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

...........मैत्री............

........................मैत्री.............................
मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी. नसेल तर होईल जीवन अळणी
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मला मैत्रिण हवीय...!

मला मैत्रिण हवीय...!

मला मैत्रिण हवीय...!
मैत्री बद्दल अपेक्षा..
मला मैत्रिण हवीय...!
जिच्याशी बोलून, जिची थट्टा करून, जिला मनातील विचारांची घालमेल सांगुन, मी
माझे दुःख हलके करू शकेन, अशी मैत्रिण मला हवीय...! जिच्या खांद्यावर डोके
ठेउन मी शांतपणे झोपी गेल्यावर तिला विंचू चावला तरी माझी झोप मोडेल, या
भिती ने जी हलणार नाही अशी मैत्रिण मला हवीय...!
जिला माझी सारी सोनेरी
स्वप्ने सांगता येतील आणि ती सांगता-सांगता हातून घडलेल्या चुकांची काबुली
जिच्यापशी देता येईल, अशी मैत्रिण मला हवीय...! या गजबजलेल्या दुनियेत
कोणाच्या मनात काय आहे? हे ऐकून घेण्यास कोणालाच वेळ नाही, पण त्याच
गजबजलेल्या दुनियेच्या गलक्यातुन "बोल मी आहे ना...! असे म्हणणारी मैत्रिण
हवीय...! असे म्हणणारी मैत्रिण हवीय...! माझ्या प्रत्येक ध्येय
प्राप्तिसाठी लागणार आत्मविश्वास माझ्यामधे निर्माण करणारी मैत्रिण मला
हवीय...!
अन कदाचित मृत्यु मला घेउन जायला आलाच, तर माझ्या जिवाभावाच्या
मित्रासह मलाही घेउन चल असे हसतमुखाने काळपुरुषास सांगनारी, मैत्रिण मला
हवीय...!
करशील का मैत्री माझ्याशी...?

करशील का मैत्री माझ्याशी...?

करशील का मैत्री माझ्याशी...?
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मुली - अशा का असतात..?

असे आधी आमची चिंता..

गेले काही दिवस कि..

का करू तुझी मी चिंता.?..



आधी आवडे बोलायला रात्रभर..

नाही मिळत वेळ नंतर त्यांना ..

अन पाहतो वाट आम्ही मुले दिवसभर..



तू माझा जानू.. तूच माझा जीव..

लोटले काही दिवस कि मग..

आपण आपलेच असतो जसे..

एकटा जीव सदाशिव...



असते आवडत प्रेमाचे आपले शब्द.

असतात आवडत प्रेम करायचे आपले मार्ग..

लोटले काही दिवस कि मग..

बोलताना असे त्या जणु निशब्द...



नाही ठेवत किंमत त्या

आपण केलेल्या प्रेमाची ..

नसे वाटत काही त्यांना..

किंमत त्या ओघळलेल्या अश्रूंची...



कुठे चुकत असतो आम्ही..

तुम्हाच सारे महत्व देतो..

नसते काळजी आम्हा आमुची..

तुम्हालाच तर सुखी ठेवतो..



कळेल तुम्हालाही एकदा..

खरे प्रेम म्हणजे काय..

कराल तुम्हीही प्रेम कोणावर जेव्हा..

अन मिळणार नाही जेव्हा तुम्हाला न्याय..तुम्हाला न्याय...
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS