ते म्हणतात...


प्रत्येक
व्यक्तीमध्ये ईश्‍वर असतो, हे लक्षात आले, तेव्हा प्रत्येक व्यक्तीकडे
आदराने, पूज्य भावनेने बघू लागलो. त्यांच्यांत ईश्‍वराचे रूप न्याहाळू
लागलो; तत्क्षणी भोवतीचे सगळे बंध तुटले, मुक्त झाल्यासारखे वाटले. -
स्वामी विवेकानंद

सल्ले अनेकजण ऐकतात; पण ऐकलेल्या सल्ल्याचा उपयोग करून यश मिळविण्याचा मार्ग फार थोडे स्वीकारतात.
- सायरस (लॅटिन लेखक)

नकारात्मक विचारांच्या त्यागामुळे आणि ध्येयाच्या सतत पाठपुराव्यामुळे यश व पुरस्कार मिळतो.
- नेपोलियन हिल

कुठल्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल, तर प्रेरणेची गरज केवळ एक टक्का असते, उरलेले 99 टक्के हे परिश्रमच असतात.
- थॉमस एडिसन

प्रतिकूल परिस्थिती आपल्या मनाला लढायला शिकविते आणि परिपक्वही बनविते.- हॅजलिट
(इंग्रजी लेखक)

प्रतिकूल परिस्थितीमध्येच आपल्याला स्वतःची ओळख होते.
- अज्ञात

वयानुसार त्वचेला सुरकुत्या पडतात; पण मनाला त्या पडू देऊ नका. दुर्दम्य उत्साह कधीही मावळता कामा नये.
- जेम्स गार्फिल्ड

कुठल्याही पत्राला रागामध्ये उत्तर देऊ नका.
- चिनी म्हण

स्वातंत्र्यरूपी सोन्याचा दरवाजा उघडण्यासाठी शिक्षणरूपी किल्ली उपयोगी ठरते.
- जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

क्षमा करा......"राजे".........आम्हाला क्षमा करा.


क्षमा करा......"राजे".........आम्हाला क्षमा करा.
गुढीपाडवा
म्हणजेच छत्रपति
संभाजी महाराज
पुण्यतिथी.

पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु
घरोघरी गुढ्या उभारतात.
त्याची 'याद' मनात
ठेऊन औरंगजेबाने आजची
संध्याकाळ निवडली होती.
की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना
त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या
राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर
टांगवून मिरवून दाखवू.
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे
उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

एक छोटीसी प्रेमकहाणी

एक छोटीसी प्रेमकहाणी

एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?

देव म्हणाला
...
बागेतून एक फुल घेवून ये.

ती मुलगी फूल आणायला गेली ,

तिला एक फूल आवडल ,

पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,

ती पुढे चालली गेली ,

पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,

जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,

तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,

तिला खूप पश्चाताप झाला ,

तिने देवाला येऊन सांगितलं ,

तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "

जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .

तेव्हा त्याची कदर नाही करत

पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत ..!
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

तु मला आवडतेस

तु मला आवडतेस

नाही !

मी प्रेम करत नाही तुझ्यावर !

पण होय तु मला आवडतेस.

याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो.

मला कोणाचं बोलणं आवडतं, कोणाचं चालणं.

कोणाचे डोळे आवडतात, तर कोणाचं हसणं.

याचा अर्थ असा नाही कि मी त्या सा-यांवर प्रेम करतो.

कारण, आवड नी प्रेम यात फरक आहे.

आवड मर्यादीत.

म्हणुनच त्याला विशेषणांची गरज आहे.

उगाच का म्हणतो आपण,

थोडं आवडतं जास्त आवडतं.

कधी म्हणताना ऎकलंय ?

माझं थोडंसच प्रेम होतं !

पण प्रेम ? प्रेम म्हणजे?

आयुष्यभर एखाद्याची सोबत करावीशी वाटणं,

आयुष्याच्या टोकापर्यंत त्याच्या सोबत चालणं !

मग वाट कशीही असो,

काट्याकुट्यांची वा मखमलीची, त्यात अंतर नाही.

आणी तुझ्या सोबत आयुष्य वाटुन घ्यावं

असंतर मला कधीच वाटलं नाही.

म्हणुनच म्हणलोना, मी तुझ्यावर प्रेम करत नही.

पण, तु मला आवडतेस.

तु मला आवडतेस, तुझ्या दिसण्यामुळं !

नव्हे.. तर तुझ्या असण्यामुळं.

होय, तुझ्या असण्यामुळं.

नुसतं असण्यामुळं म्हणण्यापेक्षा.

सोबत असण्यामुळं.

हे जास्त बरोबर आहे.

बस्स ! अशीच सोबत रहा.

कारण

तु मला आवडतेस :)
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मी हसत असतो याचा अर्थ असा नाही...........

मी हसत असतो

याचा अर्थ असा नाही,

माझं डोकं जाग्यावर नाही;

दु:खाचे प्रदर्शन करुन,

सांत्वनाचे शब्द मिळवण्यापेक्षा,

हसत राहणे वाईट नाही

मी सुखात असत

याचा अर्थ असा नाही,

दु:खात मी होरपळलो नाही;

दुसऱ्याला दु : खात खेचण्यापेक्षा,

एकट्याने होरपळणे चुकीचे नाही

सर्वांची खिल्ली उडवतो,

याचा अर्थ असा नाही,

मला त्यांच्या भावनांची कदर नहीं;

खोटी समजूत घालून,

मर्जीत राहण्यापेक्षा,

खिल्ली उडवणे वाईट नाही

कट्ट्यावर टपोरिगिरी करतो,

याचा अर्थ असा नाही,

की प्रेम मला समजत नाही;

प्रेम करुन कुणाला फसवण्यापेक्षा,

कट्ट्यावर शिट्ट्या मारणं,

टपोरिगिरीचे लक्षण नाही

पीजे मारून हसवतो,

याचा अर्थ असा नाही,

की मला परिस्थितीचे गांभीर्य नाही;

तणाव निर्माण करण्यापेक्षा,

पीजे मारून हसवण्यात

काही गैर नाही

याचा अर्थ असा नाही

की मला काही काम नाही
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

.................जीवन कविता,,,,,,,,,,,,,,,,,

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माशाची भागत नाही तहान
स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप
वाटी वाटीने ओतले तरी कमीच पडतं तूप
बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो पण मागू नको वेळ
करियर होतं जीवन मात्र, जगायचं जमेना तंत्र
बापची ओळख मुलं सांगती पैसा छापायचे यंत्र
चुकुन सुट्टी घेतलीच तरी स्वत: पाहुणा स्वत:च्याच दारी
दोन दिवस कौतुक होतं नंतर डोकेदुखी सारी
मुलच मग विचारू लागतात अजुन का हो घरी ??
त्यांचाही दोष नसतो , त्यांना सवयच नसते मुळी.
क्षणिक औदसिन्य येतं , मात्र पुन्हा सुरू होतं चक्र
करियर करियर दळण दळता दळता, स्वास्थ्य होतं वक्र
सोनेरी वेळी वाढत जातात घराभोवती चढलेल्या
आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सावरलेल्या
आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागते काही
धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही
सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं.
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS