ते म्हणतात...


प्रत्येक
व्यक्तीमध्ये ईश्‍वर असतो, हे लक्षात आले, तेव्हा प्रत्येक व्यक्तीकडे
आदराने, पूज्य भावनेने बघू लागलो. त्यांच्यांत ईश्‍वराचे रूप न्याहाळू
लागलो; तत्क्षणी भोवतीचे सगळे बंध तुटले, मुक्त झाल्यासारखे वाटले. -
स्वामी विवेकानंद

सल्ले अनेकजण ऐकतात; पण ऐकलेल्या सल्ल्याचा उपयोग करून यश मिळविण्याचा मार्ग फार थोडे स्वीकारतात.
- सायरस (लॅटिन लेखक)

नकारात्मक विचारांच्या त्यागामुळे आणि ध्येयाच्या सतत पाठपुराव्यामुळे यश व पुरस्कार मिळतो.
- नेपोलियन हिल

कुठल्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल, तर प्रेरणेची गरज केवळ एक टक्का असते, उरलेले 99 टक्के हे परिश्रमच असतात.
- थॉमस एडिसन

प्रतिकूल परिस्थिती आपल्या मनाला लढायला शिकविते आणि परिपक्वही बनविते.- हॅजलिट
(इंग्रजी लेखक)

प्रतिकूल परिस्थितीमध्येच आपल्याला स्वतःची ओळख होते.
- अज्ञात

वयानुसार त्वचेला सुरकुत्या पडतात; पण मनाला त्या पडू देऊ नका. दुर्दम्य उत्साह कधीही मावळता कामा नये.
- जेम्स गार्फिल्ड

कुठल्याही पत्राला रागामध्ये उत्तर देऊ नका.
- चिनी म्हण

स्वातंत्र्यरूपी सोन्याचा दरवाजा उघडण्यासाठी शिक्षणरूपी किल्ली उपयोगी ठरते.
- जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर

नव्या कल्पना इतिहासाला वेगळे वळण लावतात.
- जॉन केन्स

दुसऱ्याची नक्कल करून आजपर्यंत कुणीही यशस्वी झालेले नाही.
- सॅम्युएल जॉन्सन

समाजात
दोन प्रकारचे लोक असतात. काम करणारे आणि कामाचे श्रेय घेणारे. आपण नेहमी
पहिल्या गटात असावे, तिथे स्पर्धेला फारसे कुणी नसते.
- इंदिरा गांधी

युद्धासाठी सदैव तयार असणे, हे शांतता राखण्यासाठी फायद्याचे ठरते.
- जॉर्ज वॉशिंग्टन

अंधारामध्येच तेजःपुंज तारा चमकतो.
- थॉमस कार्लाईल (स्कॉटिश इतिहासतज्ज्ञ)

ज्यांनी उच्च ध्येय गाठण्याचे स्वप्न बघितलेले नाही, अशा व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्यातच समाधान मानतात.
- लॉंगफेलो (अमेरिकन कवी)

शौर्यामधील उत्तम गोष्ट म्हणजे दूरदृष्टी. - शेक्‍सपिअर
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 Response to "ते म्हणतात..."

Post a Comment