...................भेट...................

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार
मी तुला
असशील तिथे सुखी राहा, ह्याच
माझ्या शुभेच्छा तुला
निरोप तुला देतांना अश्रू माझे
वाहतील
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून
नेतील
त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब
तुझेच असेल
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात
माझा दिसेल
वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे
नाही
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे
नाही
आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार
नाही
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे
सोडणार नाही
जातेस पण जातांना एवढे सांगून
जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील
का?
जाता जाता थोडे तरी मागे वळून
पाहशील का?
प्रत्येक्षात
नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?
बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल
गोंधळaलेल्या अंत:कर्णाची खबर
मला सांगेल
कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्या पुरता तरी , तू नक्कीच
माझी राहशील!
नजरेने जरी ओळखलेस तू,
शब्दांनी मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ
आणणार नाही
नेहमीच पराभव झाला तरी , हक्क
तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शप्पत
सांगतो.... पुन्हा प्रेम करणार
नाही......
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 Response to "...................भेट..................."

Post a Comment