ते म्हणतात...


प्रत्येक
व्यक्तीमध्ये ईश्‍वर असतो, हे लक्षात आले, तेव्हा प्रत्येक व्यक्तीकडे
आदराने, पूज्य भावनेने बघू लागलो. त्यांच्यांत ईश्‍वराचे रूप न्याहाळू
लागलो; तत्क्षणी भोवतीचे सगळे बंध तुटले, मुक्त झाल्यासारखे वाटले. -
स्वामी विवेकानंद

सल्ले अनेकजण ऐकतात; पण ऐकलेल्या सल्ल्याचा उपयोग करून यश मिळविण्याचा मार्ग फार थोडे स्वीकारतात.
- सायरस (लॅटिन लेखक)

नकारात्मक विचारांच्या त्यागामुळे आणि ध्येयाच्या सतत पाठपुराव्यामुळे यश व पुरस्कार मिळतो.
- नेपोलियन हिल

कुठल्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल, तर प्रेरणेची गरज केवळ एक टक्का असते, उरलेले 99 टक्के हे परिश्रमच असतात.
- थॉमस एडिसन

प्रतिकूल परिस्थिती आपल्या मनाला लढायला शिकविते आणि परिपक्वही बनविते.- हॅजलिट
(इंग्रजी लेखक)

प्रतिकूल परिस्थितीमध्येच आपल्याला स्वतःची ओळख होते.
- अज्ञात

वयानुसार त्वचेला सुरकुत्या पडतात; पण मनाला त्या पडू देऊ नका. दुर्दम्य उत्साह कधीही मावळता कामा नये.
- जेम्स गार्फिल्ड

कुठल्याही पत्राला रागामध्ये उत्तर देऊ नका.
- चिनी म्हण

स्वातंत्र्यरूपी सोन्याचा दरवाजा उघडण्यासाठी शिक्षणरूपी किल्ली उपयोगी ठरते.
- जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

क्षमा करा......"राजे".........आम्हाला क्षमा करा.


क्षमा करा......"राजे".........आम्हाला क्षमा करा.
गुढीपाडवा
म्हणजेच छत्रपति
संभाजी महाराज
पुण्यतिथी.

पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु
घरोघरी गुढ्या उभारतात.
त्याची 'याद' मनात
ठेऊन औरंगजेबाने आजची
संध्याकाळ निवडली होती.
की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना
त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या
राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर
टांगवून मिरवून दाखवू.
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS